मुंबई विद्यापीठ अभ्यास केंद्र इमारतीचे भूमिपूजन मंत्री स्मृती इराणी, चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

मुंबई ( प्रतिनिधी ) प्राचीन, समृद्ध आणि वैभवशाली पारसी-झोराष्ट्रीयन संस्कृतीच्या अध्ययन आणि संशोधनासाठी या शैक्षणिक वर्षापासून मुंबई विद्यापीठात अवेस्ता पहलवी अभ्यासकेंद्र सुरू होणार आहे. या अभ्यास केंद्राच्या इमारतीचे भूमीपूजन केंद्रीय महिला व बाल विकास आणि अल्पसंख्यांक कार्यमंत्री स्मृती इराणी तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात झाले. चंद्रकांत… Continue reading मुंबई विद्यापीठ अभ्यास केंद्र इमारतीचे भूमिपूजन मंत्री स्मृती इराणी, चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

शासकीय तंत्रनिकेतन इमारत सुशोभीकरण प्रश्न मार्गी लागणार- मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय तंत्रनिकेतन इमारतींची डागडुजी, रंगकाम, सुशोभीकरण आदी कामांचा आढावा घेतला. मुंबईतील शासकीय निवासस्थान रायगड (अ-6) येथे ही बैठक संपन्न झाली. याप्रसंगी शासकीय तंत्रनिकेतनच्या Facelifting च्या अंदाज पत्रकास मान्यता देण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने विभागनिहाय संबंधित मुख्य… Continue reading शासकीय तंत्रनिकेतन इमारत सुशोभीकरण प्रश्न मार्गी लागणार- मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयाने रिअल इस्टेट उद्योगात खळबळ..!

मुंबई ( वृत्तसंस्था ) मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय दिल्याने रिअल इस्टेट उद्योगात खळबळ उडाली आहे. एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने निर्णय दिला की फ्लॅटच्या विलंबासाठी व्याजासह परताव्यासाठी सह-प्रवर्तक जबाबदार आहे. प्रवर्तक या शब्दाचा अर्थ लावताना, त्यात सह-प्रवर्तकांचाही समावेश असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने म्हटले की, जर एखाद्या व्यक्तीने प्रवर्तकासोबत प्रकल्पात गुंतवणूक केली असेल… Continue reading मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयाने रिअल इस्टेट उद्योगात खळबळ..!

आता उच्च शिक्षण घेता येणार माय मराठीतून- मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई ( प्रतिनिधी ) राज्यातील पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता इंग्रजीबरोबर मराठीतही परीक्षा देता येणार आहे. यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशाश्त्र विद्यापीठ कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधिमंडळात मंजूर झाले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत हे विधेयक मांडले. या अभ्यासक्रमासाठी मराठी पुस्तके उपलब्ध झाली असून उच्च शिक्षणअभ्यासक्रम मराठीतून… Continue reading आता उच्च शिक्षण घेता येणार माय मराठीतून- मंत्री चंद्रकांत पाटील

‘शांताई वृद्धाश्रमा’च्या आजी-आजोबांनी केली जीवाची मुंबई

बेळगाव ( प्रतिनिधी ) आपल्या कुटुंबीयांपासून दुरावलेल्या आणि शांताई वृद्धाश्रमात आपल्या जीवनाचा उत्तरार्थ व्यतीत करत असलेल्या आजी-आजोबांनी चार दिवस अक्षरशा जीवाची मुंबई केली. बेळगाव- मुंबई-बेळगाव विमानाने प्रवास आणि चार दिवसात मुंबईतील धार्मिक आणि महत्त्वाच्या सुप्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट, त्याचबरोबर सिद्धिविनायक आणि महालक्ष्मीचे दर्शन अशी ही आगळी वेगळी सहल त्या आजी आजोबांच्या जीवनातील संस्मरणीय सफर ठरली.… Continue reading ‘शांताई वृद्धाश्रमा’च्या आजी-आजोबांनी केली जीवाची मुंबई

‘दंगल’ फेम बबिता फोगटचं निधन; अवघ्या 19 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई ( वृत्तसंस्था ) ‘दंगल’ चित्रपटात बबिता फोगटची बालपणीची भूमिका साकारणारी मुलगी सुहानी भटनागरचे निधन झाले. ती फक्त 19 वर्षांची होती. त्याच्या संपूर्ण शरीरात द्रव साचला होता. रिपोर्टनुसार, काही काळापूर्वी सुहानीला अपघात झाला होता, याच्यात तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. या उपचारादरम्यान तीने घेतलेल्या औषधांच्या झालेल्या प्रतिक्रियेमुळे शरीरात द्रव साचू लागले अन् यातच तिचा मृत्यू… Continue reading ‘दंगल’ फेम बबिता फोगटचं निधन; अवघ्या 19 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रीया; म्हणाले काँग्रेस सोडणे हा माझा***

मुंबई ( वृत्तसंस्था ) काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मी अजून मन बनवलेले नाही, येत्या काही दिवसांत निर्णय घेईन असे ते म्हणाले. तसेच सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, आपला कोणाशीही द्वेष नाही, यापुढेही महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत राहणार असल्याचे चव्हाण म्हणाले. काँग्रेसला तिसरा धक्का 2024 च्या लोकसभा… Continue reading राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रीया; म्हणाले काँग्रेस सोडणे हा माझा***

जर्मनीच्या शिष्टमंडळाने घेतली वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट

मुंबई ( प्रतिनिधी ) जर्मनीच्या शिष्टमंडळाने दिनांक 30 जानेवारी रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मंत्रालयात भेट घेतली. जर्मनी देशाला मागणीप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रातील विविध कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी सहकार्य करण्यात येणार असल्याचे श्री मुश्रीफ यांनी सांगितले. महाराष्ट्रातील तरुणांच्या कौशल्य विकासासाठी आणि रोजगारासाठी जर्मनीला पाठवण्या विषयी चर्चा करण्यात आली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्यासह… Continue reading जर्मनीच्या शिष्टमंडळाने घेतली वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट

जर्मनीला कुशल मनुष्यबळ मिळण्यासाठी महाराष्ट्र पुढाकार घेईल- मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई ( प्रतिनिधी ) मंत्रालयात जर्मनी शिष्टमंडळातील फ्रॅंक झुलर, अंद्रेस रिस्किट या सदस्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. याप्रसंगी जर्मन शिष्टमंडळासमवेत बैठक आयोजित करून उच्च व तंत्र शिक्षण विभागा संबंधित विविध विषयांवर चर्चा केली. यात जर्मनीला किमान 4 लाख कुशल, प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे अधोरेखित करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जर्मन येथे… Continue reading जर्मनीला कुशल मनुष्यबळ मिळण्यासाठी महाराष्ट्र पुढाकार घेईल- मंत्री चंद्रकांत पाटील

मोठी बातमी…! 22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

मुंबई ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारमार्फत आयोध्या राम मंदिर मुर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने उत्सवासाठी जंगी तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली. त्यानंतर आता राज्य सरकारनेही याबाबत मोठा निर्णय जाहीर करत सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. आमदार सत्यजीत तांबेंसह अनेक नेत्यांनी 22 जानेवारीला श्री राम… Continue reading मोठी बातमी…! 22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

error: Content is protected !!