‘द डर्टी पिक्चर’मधल्या अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू

0
110

मुंबई (प्रतिनिधी) : ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटात भूमिका साकारलेली अभिनेत्री देवदत्त बॅनर्जी ऊर्फ आर्या हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोलकातामधील जोधपूर पार्क इथल्या तिच्या निवासस्थानी देवदत्त मृतावस्थेत आढळली. अनेकदा दार ठोठावूनही आतून काही उत्तर न आल्याने घरकाम करणाऱ्या व्यक्तीने शेजाऱ्यांना बोलावले. बऱ्याच वेळापासून घरात बंद असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. पोलिसांनी दार उघडताच देवदत्त तिच्या बेडरुममध्ये जमिनीवर मृतावस्थेत आढळली. ही घटना काळ (शुक्रवारी) घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या नाकावर रक्ताचे काही डाग होते. देवदत्तला एसएसकेएम रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. देवदत्तचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याता आला आहे. शवविच्छेदनाचे अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी देवदत्तचे दोन मोबाइल फोनसुद्धा तपासासाठी जप्त केले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here