इचलकरंजी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या नगररचना खात्याचे संचालक सुधाकर नांगनुरे यांची शहराला सदिच्छा भेट आणि त्यांची संचालक पदी निवड झाल्याबद्दल आ. प्रकाश आवाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शासनाच्या जाचक अटी आणि नियमांमुळे नवे बांधकाम  किंवा विस्तार करतानाचा परवाना घेताना येणाऱ्या अडचणी उपस्थितांनी सांगितल्या.

तर बरीचशी बांधकाम प्रकरणे निर्णयाअभावी प्रलंबीत असल्याचा तक्रारी नितीन धूत आणि मयूर शहा यांनी मांडल्या. संचालक सुधाकर नांगनुरे यांनी नव्याने मंजूर केलेला एकत्रित विकास नियंत्रण आणि शहरभाग विकसीत आरक्षण जागा खरेदी-विक्रीच्या समस्या, झोपडपट्टी पुनर्वसन आणि मार्गदर्शन, नागरी वस्ती निर्माण करण्यासाठी  शासनस्तरावर पाठपुरावा करून अशी ग्वाही दिली.

यावेळी अलका स्वामी, तानाजी पवार, संजय केंगार, सरिका पाटील,  मुख्यआधिकारी संतोष खांडेकर, मदन कांरडे, दीपक सुर्वे, प्रकाश मोरबाळे, शशांक बावचकर, मनोज सांळुखे, अजित जाधव, मनोज हिंगमिरे, महादेव गौड, प्रकाश दतवाडे, प्रविण खामकर, इंजिनिअर, पालिका अधिकारी उपस्थित होते.