दिव्यांग संघटनेतर्फे नायब तहसिलदारांना निवेदन

0
14

पन्हाळा (प्रतिनिधी) : दिव्यांगांचे लोकडाऊन काळातील घरगुती वीज बिल माफ व्हावे, दिव्यांगांचा घरफाळा १०० टक्के माफ व्हावा, अशा मागणीचे निवेदन राजर्षी छत्रपती शाहू महाराज दिव्यांग संघटनेच्या वतीने पन्हाळा नायब तहसिलदार विनय कवलवकर यांना देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  कोरोना पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात बेरोजगारी सुरू आहे. तालुक्‍यातील दिव्यांगांचे रोजगार देखील बुडलेला आहे. दिव्यांग बंधू-भगिनींचे छोटे-मोठे व्यवसाय बंद पडले आहेत. यातच घरगुती लाईट बिलाचे मोठ्या प्रमाणात वाढून आले आहेत. दिव्यांग बंधु-भगिनींची आर्थिक परिस्थिती ढासळल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासन निर्णयानुसार दिव्यांगांना अंत्योदय धान्य मिळावे, फेब्रुवारी २०२० पासून संजय गांधी योजनेची रक्कम मिळावी, ज्या ग्रामपंचायतीने पन्हाळा तालुक्यातील तीन टक्के व पाच टक्के निधी खर्च केला नाही, अशा ग्रामपंचायतीवर (अपंग कायदा २०१६ नुसार )कारवाई व्हावी, असे निवेदनात म्हटले आहे.

तरी सर्व विषयांचा निर्णय सात दिवसांमध्ये न झाल्यास आम्ही ३ डिसेंबर ‘जागतिक अपंग दिन’ रोजी लाक्षणिक उपोषण आपल्या कार्यालयासमोर करणार असल्याची ग्वाही तालुका अध्यक्ष आविनाश केकरे यांनी दिली.

यावेळी विजय महापुरे, भारत दुगीडे, भास्कर कनेरकर, अमर शेडगे, सखाराम पाटील, श्रुतिक जाधव, राहुल जाधव, पांडुरंग जाधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here