गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कोरोनामुळे गेले आठ महिने बंद असणाऱ्या शाळा, महाविद्यालये आता सुरू झाली आहेत. गडहिंग्लज हे शैक्षणीक केंद्र असून अनेक विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असतात. पण गडहिंग्लज आगराने अजूनही ग्रामीण भागात पुरेश्या बस फेऱ्या सुरू केलेल्या नाहीत. याचा त्रास विद्यार्थ्यांना होत आहे. तरी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून येथील गडहिंग्लज आगार प्रमुखांनी ग्रामीण भागात बस फेऱ्या वाढवाव्यात, अशा मागणीचे निवेदन न्यू युवा मंचच्या वतीने आगार प्रमुखाना देण्यात आले. या निवेदनावर काशिनाथ गडकरी,हल्लप्पा भमानगोळ,निकेतन चव्हाण,प्रकाश पाटील आदींच्या सह्या आहेत.