कोल्हापूर (प्रतिनिधी) : नववी ते बारावीपर्यंतची शाळा सुरू झाल्याने शिक्षकांना कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. चाचणी मोहिमेत ५८ शिक्षकांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. एकाच दिवसांत १० शिक्षकांना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे कोरोना चाचणीसाठी गेल्यानंतर शिक्षकांच्या ह्रदयाचा ठोका चुकत आहे.

पॉझिटिव्ह शिक्षकांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. ते कोरोना चाचणी न करता अध्यापनास गेले असते, तर विद्यार्थ्यांना बाधा होण्याची शक्यता होती. पण चाचणी झाल्याने बाधीत शिक्षकांवर वेळेत उपचारही सुरू झाले आहेत. जिल्हयात पॉझिटिव्हमध्ये सर्वाधिक शिक्षक करवीर तालुक्यातील आहेत.

पॉझिटिव्ह शिक्षकांची तालुकानिहाय संख्या अशी :

आजरा १, भुदरगड २, चंदगड १०, गडहिंग्लज १, कागल ३, करवीर १९, राधानगरी ७, शाहूवाडी ४, हातकणंगले ३, शिरोळ ४, कोल्हापूर शहर ५. पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यांतील आतापर्यंत तपासणी झालेल्या सर्व शिक्षकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.