आजरा (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यातील शिरसंगी  येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील कारभाराबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या. याबाबत आजरा तालुका शिवसेनेच्या वतीने निवेदन देऊनही काहीही सुधारणा न झाल्याने शिवसेनेने आज (मंगळवार) शाखेवर मोर्चा काढला. यावेळी चंदगड विधानसभा संपर्कप्रमुख सुनील शिंत्रे, उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, तालुका प्रमुख युवराज पोवार,  शहर प्रमुख ओमकार माद्याळकर  यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळकडून अर्थसाह्य देण्यास टाळाटाळ करणे, महिलांना व ग्राहकांना उधट उत्तरे देणे,  ग्राहकांना हिंदीत संभाषण करण्यास सांगणे,  बचत गटांना कर्ज देण्यास टाळटाळ करणे, शेतकरी पीक कर्ज देण्यासाठी विलंब करणे आदीबाबत  बँकेबद्दल  अनेक तक्रारी होत्या.

यावेळी युवा सेनेचे महेश पाटील,  संजय येसादे,  सुनील डोंगरे, उत्तम कांबळे, संताजी डोंगरे, कृष्णा पाटील, विठ्ठल घेवडे, प्रकाश ढवळे,  नारायण कांबळे, तातू अण्णा बटकडली,  प्रताप थोरवत,  जयसिंग थोरवत,  पांडुरंग शिंदे, शंकर संकपाळ, महादेव सुतार, सुनील सातवणेकर, सुयश पाटील, सुधाकर चोगुले, संजय भाई, दिनेश कांबळे, विलास पाटील, तुषार कदम, अर्जुन फडके, कृष्णा सुतार, धोंडीबा गावडे, अरुण कांबळे आदी उपस्थित होते.