कोल्हापूर (प्रतिनिधी ) :करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात आज (रविवार) जिल्हा शिवसेनेच्या वतीने राज्यातील मंदिर खुले करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. तसेच साखर-पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

 

गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनामुळे राज्यातील धार्मिक स्थळ, मंदिरं बंद ठेवण्यात आली आहेत. दरम्यान सध्या राज्यातील कोरोनाची परिस्थिती कमी होत असल्याने सोमवारपासून (दि.१६) राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने शनिवारी घेतला. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत जिल्हा शिवसेनेच्या वतीने अंबाबाई मंदिर परिसरात साखर पेढे वाटप करून करण्यात आले. यावेळी जय शिवाजी-जय भवानी अशा घोषणांनी मंदिर परिसर दणाणून सोडला. तर मंदिर उघडण्याच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांचे आभार ही मानण्यात आले.

यावेळी जिल्हा प्रमुख विजय देवणे, सुजित चव्हाण, शशिकांत बिडकर, मंजित माने, दिलीप देसाई, अनिल चोपदार, शिवाजी जाधव, स्मिता सावंत, दीपाली शिंदे, दत्ताजी टिपूगडे, राजू जाधव, वैभव जाधव, अरविंद घाटगे, निलेश जाधव, दिलीप सूर्यवंशी, अभिजित बुकशेट, राजू टिळके, शरद नागवेकर आदीसह जिल्हा शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या.