पन्हाळा उपनगराध्यक्षपदी शरयु लाड बिनविरोध

0
125

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी जनसुराज्यशक्ती पक्षाच्या नगरसेविका शरयु लाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगर परिषदेच्या सभागृहात आज (शुक्रवारी) पार पडलेल्या सभेत ही निवड करण्यात आली. पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी काम पाहिले.

पन्हाळा नगरपरिषदेवर जनसुराज्यशक्ती पक्षाची एक हाती सत्ता आहे. त्यामुळे नगराध्यक्षासह उपनगराध्यक्ष, बांधकाम सभापती आदी महत्त्वाची पदे जनसुराज्य पक्षाकडे आहेत. चेतन भोसले यांनी आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यासाठी आज सकाळी ११ वाजता शरयु लाड यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला होता. अर्जाची छाननी होऊन हा अर्ज वैध ठरवण्यात आला. त्यानुसार नगरपरिषदेच्या सभेत शरयु लाड यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने दुपारी एक वाजता नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी लाड यांची उपनगराध्यक्ष म्हणून अधीकृत घोषणा केली. यावेळी आजी-माजी नगरसेवक व जनसुराज्यशक्ती पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here