शरद पवार  ‘यूपीए’च्या  अध्यक्षपदी ? : काँग्रेस नेत्याचा मोठा खुलासा

0
233

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. युपीए अध्यक्ष होण्याची इच्छा शरद पवार यांची असेल, असे मला वाटत नाही. हे काही पंतप्रधानपद नाही आणि स्वत: शरद पवार यांची युपीए अध्यक्षपदी आपले नाव  जाहीर करण्याची इच्छा नसावी, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.

याबाबत जेव्हा बैठक होईल तेव्हा योग्य व्यक्तीची निवड करण्यात येईल. आम्ही पंतप्रधानांची निवड नाही करत आहोत.  युपीए अध्यक्ष अशी काही गोष्टच नाही.  जर मित्रपक्षांची बैठक बोलावली तर काँग्रेस अध्यक्ष त्याचे नेतृत्व करणार हे नैसर्गिक आहे.  युपीएची बैठक घेण्यासाठी काही पक्ष पुढाकार घेऊ शकतात आणि काँग्रेस त्यात सहभागी होईल. पण जर काँग्रेसने बैठक बोलावली असेल, तर काँग्रेसचाच नेता बैठकीचे नेतृत्व करेल, असे पी चिदंबरम यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here