जिल्हा भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची निवड

0
60

इचलकरंजी (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून त्यांना नियुक्ती पत्र वाटप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटील, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष झाकिरभाई जमादार उपस्थित होते.

यावेळी अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा सरचिटणीस म्हणून तय्यब कुरेशी, तर जिल्हा उपाध्यक्षपदी औरंग शेख यांची निवड करण्यात आली. तर शफीक बागवान, इम्रान बागवान, तय्यब गडकर, बस्तू बारदेस्कर, आब्बास नदाफ, महिला प्रमुख असिया गवंडी, जैनप्रमुख महावीर तकडे यांची चिटणीसपदी निवड करण्यात आली. त्याचबरोबर सदस्य म्हणून इर्शाद फकीर, शौकत आगा, इरफान बहादूर, मुबारक अत्तार, जिलानी टाकवडे, युनूस नदाफ यांची निवड करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here