पुणे (प्रतिनिधी) : नुकतीच कोरोना रुग्णांची संख्येत घट होत होती. त्यातच मागील काही दिवसांपासून पुन्हा रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुणे महापालिकेने शहरातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबद्दलची माहिती दिली. 

याबरोबरच मुंबई, ठाणे आणि पनवेलमधील सर्व शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता महापालिका आणि खासगी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. १३ डिसेंबरला कोरोना स्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल आणि त्याआधी पालकांशी चर्चा केली जाईल, असे मोहोळ म्हणाले.