सराफ संघाने छ. शिवाजी चौकात उभारला ‘वीज बिल भरणार नाही’ फलक

0
237

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे ‘वीज बिल भरणार नाही’ या आशयाचा फलक छ. शिवाजी चौक येथे उभारण्यात आला आहे. आज (सोमवार) या फलकाचे उद्घाटन संघाचे पदाधिकारी, संचालक व वीज बिल भरणार नाही कृती समितीच्या वतीने करण्यात आले.

या वेळी निवास साळोखे, बाबा इंदूलकर, बाबा पार्टे, संघाचे सचिव अनिल पोतदार (हुपरीकर) यांनी मार्गदर्शन केले. या वेळी ‘वीज बिल भरणार नाही, माफ करा, माफ करा वीज बिल माफ करा’, अशा घोषणांनी शिवाजी चौक दुमदुमून गेला. गांधी मैदान येथून गुरुवारी ७ जानेवारी २०२१ रोजी करण्यात येणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने वाहनांसह सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी कृती समितीला कामानिमित्त सराफ व्यापारी संघाचा हॉल वापरण्यास घ्यावा, असे सुचवले. त्याचबरोबर गुरुवारच्या मोर्चात मोठ्या संख्येने सराफ व्यावसायिक सहभागी होतील, अशी ग्वाही दिली.

या वेळी बाबा भुयेकर, जयकुमार शिंदे, सुजित चव्हाण, संचालक शिवाजी पाटील, बन्सी चिपडे, नंदकुमार ओसवाल, राजू बारस्कर, शीतल पोतदार यांच्यासह सभासद व कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here