कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने किल्ले पन्हाळा येथे स्वच्छता मोहीम राबवून अभिवादन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष रुपेश पाटील, पन्हाळा तालुकाध्यक्ष संदीप यादव, शहर उपाध्यक्ष निलेश सुतार, करवीर उपाध्यक्ष सचिदानंद गुरव, अॅड.सर्वेश राणे, धिरेंद्र घारड, स्वप्निल यादव, अमित सोनुले ,अमृत रणदिवे, वर्षा पाटील, शौर्य पाटील, प्रमोद पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
इचलकरंजीतील नोटिसा बजावलेल्या ९ प्रोसेसची ‘प्रदूषण नियंत्रण’कडून अचानक पाहणी
इचलकरंजी (प्रतिनिधी) : वाढत्या पाणी प्रदूषणास जबाबदार असल्याच्या कारणावरुन प्रदूषण नियंत्रण मंडळाने आज (शुक्रवार) इचलकरंजी शहरातील ९ प्रोसेसना काम बंद ठेवण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यापैकी काही प्रोसेस सुरु असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने प्रदूषण नियंत्रण...
लांबोरे कुटुंबीयांना हवाय मदतीचा हात…
धामोड (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यातील तिलारी नगराच्या पूर्वेकडील बांद्राई धनगरवाड्यावरील लांबोरे कुटुंबीय १२ फेब्रुवारी रोजी देवदर्शनासाठी पंढरपूरला निघाले होते. त्यांच्या मोटारीने पंढरपूरजवळ कासेगाव रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिल्याने या कुटुंबातील चौघांचा जागीच...
कर्जवसुलीसाठी तरुणांना धमकी देणाऱ्या खाजगी सावकारावर गुन्हा…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : न्यू शाहूपुरी परिसरातील महाविद्यालयीन तरुणांना भरमसाठ व्याजाने कर्ज देऊन त्याच्या वसुलीसाठी शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी खासगी सावकार मसूद निसार शेख (रा. न्यू शाहूपुरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात...
प्रारुप मतदार यादीवरील हरकतींच्या निर्गतीचे काम अजूनही सुरूच…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीवर आलेल्या हरकतींची निर्गत करण्याचे काम अद्याप सुरूच आहे. याबाबतचा अहवाल सोमवार नंतर महापालिकेकडून राज्य निवडणूक आयोगाकडे जाण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात...
शिवाजी मार्केट, कपिलतीर्थ मार्केटमधील ४४ गाळेधारकांच्या भाडेसंदर्भातील याचिका नामंजूर
कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेच्या छ. शिवाजी मार्केट आणि कपिलतीर्थ मार्केटमधील ४४ गाळेधारक व्यापाऱ्यांच्या भाडेसंदर्भातील याचिका मे. सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायालयाने नामंजूर केली आहे. जिल्हाधिकारी आयुक्त व मुद्रांक जिल्हाधिकारी या समितीमार्फत निश्चित होणारे...