कोल्हापूर (प्रतिनिधी) : आशा व गटप्रवर्तक यांचे कार्यमुक्तीचे आदेश मागे घेण्यात ग्रामविकास मंत्री नाम. हसन मुश्रीफ यांनी मोलाची सहकार्य केले. त्याबद्दल संघटनेमार्फत आज (रविवार) कागल येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.

आशा व गटप्रवर्तक यांनी अनेक मागण्यासंदर्भात आंदोलन पुकारले होते.म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी कार्यमुक्तीचे आदेश दिले होते. आशा व गटप्रवर्तक संघटनेने जिल्हापरिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले होते. त्यादिवशी नाम. मुश्रीफ यांनी मित्तल यांना कार्यमुक्तीचे आदेश मागे घेण्यास सांगितले आणि त्यांच्याबरोबर बैठक घेऊन मागण्यासंदर्भात विचार विनिमय करायला सांगितले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे मंजूर झालेले दोन आणि तीन हजारांचे वाढीव मानधन जिल्ह्यातील तीन हजार आशा व गटप्रवर्तक यांच्या  खात्यावर ताबडतोब वर्ग झाले. यानिमित्ताने आशा व गटप्रवर्तक युनियनच्यावतीने आज कागल येथे सत्कार करून आभार मानन्यात आले.

या वेळी सीआयटीयुचे जिल्हा सचिव के. शिवाजी मगदूम, जिल्हा सचिव उज्वला पाटील, संगिता पाटील, कागल तालुका अध्यक्ष मनिषा पाटील, आजरा तालुका अध्यक्ष मंदाकिनी कोडक, दिपा बुरुड, लाल बावटा बांधकामचे जिल्हा खजानिस प्रकाश कुंभार, आनंदा कराडे, सारिका पाटील, विद्या बोभाटे, सुरेश बोभाटे, मनिषा म्हातुगडे आदी उपस्थित होते.