नाशिक (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.   

रोहित पवार म्हणाले, पार्थ पवार यांच्या उमदेवारीबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तिथले पालकमंत्री निर्णय घेतील. कार्यकर्ते बोलून जातात पण निर्णय नेते घेत असतात. योग्य तो न्याय तिथे असलेल्या लोकांना दिला जाईल.  परिस्थिती आणि कार्यकर्त्यांची मागणी लक्षात घेतली जाईल. कोणी अशी मागणी केल्याने ती पूर्ण होईलच असेही होत नाही.