कोरोना काळातील वास्तव अधोरेखित करणारा लघुपट ‘जबाबदार’

0
42

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लॉकडाऊननंतर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सर्वसामान्य माणसाला कोरोना काळातही घराबाहेर पडावे लागते. हे सगळं करत असताना कोरोनाच्या धोक्यापासून वाचण्यासाठी कशी खबरदारी घेणे आवश्यक आहे. याचे वास्तव चित्रण ‘जबाबदार’ या लघुपटात केले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हुपरी येथील तीन ध्येय वेड्या तरुणांनी साकारलेल्या या  लघुपटाला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

किरण खड्ड (पट्टणकोडोली),  हुपरीचे ओंकार पोतदार आणि रवि पायमल यांनी बनवलेल्या या लघुपटाला जवळजवळ ८ आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टिवलमध्ये नामांकन मिळाले आहे.  इटली, जपान, फिलीफिन्स, अमेरिका हे देश व गुजरात, दिल्ली या शहरात भरवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा दर्जेदार लघुपट म्हणून दाखविण्यात आला आहे.

या लघुपटामध्ये  रवींद्र पायमल, रेणू रांगोळे यांची  प्रमुख भूमिका असून महादेव केरु, सायली कुळकर्णी, शरद पोवार यांनी सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. लेखक, दिग्दर्शक किरण खड्ड  असून निर्माती रविंद्र पायमल, किरण खड्, ओंकार पोतदार  यांनी केले आहे. छायांकन, संकलन  ओंकार पोतदार यांनी केले आहे. तर संगीत सूरज गवळी यांनी दिले आहे. सहाय्यक दिग्दर्शक  म्हणून विजय रजपूत, अविनाश शिंदे यांनी काम पाहिले.  निर्मिती व्यवस्था अजय घोडगे व विनायक रांगोळे यांची आहे. या लघुपटासाठी अरिप शिकलगार (हॉटेल आशा हुपरी) किसन बापू चव्हाण (रेंदाळ), रणजीत चव्हाण, अशोक चव्हाण, शुभम बोंगाळे, शांतिनाथ खड्ड, अरूण पतंगे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here