शहरातील आठ ओपन स्पेसवरील अतिक्रमणे हटविली

0
50

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील आठ ओपन स्पेसवरील अतिक्रमणे आज (बुधवार)  महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून हटविण्यात आली. यामध्ये गंधर्वनगरी येथील अनाधिकृत एक शेड, हिंदू कॉलनी येथील एक शेड, सुलोचना पार्क येथील तीन शेड आणि फुलेवाडी रिंगरोड येथील एक पत्र्याचे शेड काढण्यात आले.  

ही कारवाई शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर अभियंता एन.एस.पाटील, कनिष्ठ अभियंता अनिरुध्द कोरडे व मुकादम यांनी केली.  यापुढेही अतिक्रमण कारवाई अशीच चालू राहणार असून संबंधितांनी अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here