रावसाहेब दानवेंच्या जावयावर पुण्यात गुन्हा दाखल

0
85

पुणे (प्रतिनिधी) : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह एका महिलेवर पुण्यातील चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अमन अजय चड्डा (वय २८, रा. बोपोडी) यांनी फिर्याद दिली आहे.

हर्षवर्धन रायभान जाधव (वय ४३, रा. बालेवाडी) व इषा बालाकांत झा (वय ३७, रा. वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना सोमवारी सकाळी सातच्या सुमारास ब्रेमन चौकाकडे जाणाऱ्या रोडवर औंध परिसरात घडली. हर्षवर्धन जाधव हे भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चड्डा यांचे आई-वडील ब्रेमन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून दुचाकीने दावाखान्यात निघाले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या कारचा दरवाजा अचानक उघडला. दरम्यान अचानक दरवाजा उघडल्याने झालेल्या अपघातात फिर्यादींच्या आईच्या पायाला मार लागला. त्याबाबत फिर्यादींच्या वडिलांनी जाधव यांना जाब विचारला. त्यावरून त्यांच्यात वादावादीला सुरूवात झाली असता, संशयितांनी त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. फिर्यादींचे वडील हे त्यांची हार्ट सर्जरी झाल्याचे सांगत होते. तरी देखील आरोपींनी फिर्यादींच्या वडिलांच्या छातीत व पोटात लाथा मारल्या. तसेच त्यांच्या आईला देखील लाथ मारून जीवे मारण्याच्या उद्देशाने जिवितास धोका निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here