कोल्हापूर (प्रतिनिधी) : या वर्षीचे महाभयंकर कोरोना संकट, मागील दोन महिन्यात क्षीरसागर कुटुंबीयांवर कोसळलेले दु:ख या पार्श्वभूमीवर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस आज (मंगळवार) शिवसैनिक, मित्रपरिवार, हितचिंतकांच्या शुभेच्छांनी, नियमांचे पालन करीत अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. मागील काही महिन्यात निकटवर्ती हिरावल्याचे वेदनादायक अनुभव आपल्यालाही आले असतील, पण तरीही एकमेकांना धीर देत आपण कोरोना संकटाचा सामना करत आहोत. अशा परिस्थिती त वाढदिवस साजरा करणे योग्य नाही, त्यामुळे हा वाढदिवस कोरोना योद्ध्यांच्या कार्याला समर्पित करीत असल्याचे,.राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

सकाळी राजेश क्षीरसागर यांनी पत्नी व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ. वैशाली यांचेसह करवीरनिवासिनी आई अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर शिवसेना राजारामपुरी विभागाच्या वतीने क्षीरसागर दाम्पत्याच्या हस्ते पांजरपोळ येथे गोमातेचे पूजन करून डाळ, गूळळ, चारा वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना विभागप्रमुख मंदार तपकिरे, सौ.अनुजा तपकिरे, शिवसेना उपशहरप्रमुख दीपक चव्हाण, विभागप्रमुख अश्विन शेळके, अंकुश निपाणीकर, युवासेना उपशहरअधिकारी दादू शिंदे, आसिफ मुल्लाणी आदी उपस्थित होते.

यानंतर क्षीरसागर यांनी शिवसेना शहर कार्यालयात शुभेच्छा स्वीकारल्या. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवा सेना अध्यक्ष व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेनेचे नेते, सचिव, राज्यातील विविध मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, शिवसेनेचे पदाधिकारी यांनी एसएमएस, व्हाट्‌सअप माध्यमातून शुभेच्छा दिल्या. या सर्वांचे राजेश क्षीरसागर यांनी आभार मानले. यावेळी युवा नेते ऋतुराज आणि पुष्कराज क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, शिवसैनिक उपस्थित होते.