सावरवाडी (प्रतिनिधी) : कोरोना काळात सामान्य जनतेला दिलासा देऊन शासनाच्या नियमांंचे पालन करून अंगणवाडी, आरोग्यसेविकांचे केलेले कार्य हे समाजाभिमुख आहे, असे प्रतिपादन करवीर पंचायत समितीचे माजी सभापती व उद्योगपती राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले. कसबा बीड (ता. करवीर) येथे कोरोनाकाळात प्रामाणिक काम केल्याबद्दल गावातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मदतनीस यांना सूर्यवंशी यांच्याहस्ते साडी भेट देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

या प्रसंगी गोकुळचे जनसंपर्क अधिकारीपदी निवड झालेबद्दल बहिरेश्वरचे पी. आर. पाटील तसेच कोरोना काळात अविरत वैद्यकीय सेवा देणारे डॉ. के. डी. पाटील, डॉ. मानसिंग पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास गणपती वरुटे, दिनकर गावडे, दिनकर सूर्यवंशी, कृष्णात हळदकर, देवानंद गायकवाड, पुंडलीक सूर्यवंशी, शिवाजी जाधव, भिकाजी कुंभार, सचिव नामदेव माने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.