शिवसेनेला धक्का : माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

0
459

नाशिक (प्रतिनिधी) : शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज (सोमवार) भाजपमध्ये प्रवेश केला. नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

फडणवीस म्हणाले की, पक्षापासून दूर गेलेले सानप आज पुन्हा एकदा भाजपमध्ये परतले आहेत. कुंभमेळ्यांच्या वेळी सानप यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केले आहे. सर्व अडचणी दूर करत कुंभमेळा चांगल्या प्रकारे पाडला होता. सानप जमिनीशी जोडलेले नेते आहेत. जुने-नवे अशी कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे कुणीही वाद करण्याचे कारण नाही. नाशिक भाजपचा बाल्लेकिल्ला असून पुन्हा एकदा त्याच ताकदीने पक्ष मजबूत करायचा आहे.

दरम्यान, सानप यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात आला. परंतु त्यात शिवसेनेला यश आले नाही. अखेर सानप यांनी कमळ हाती घेतल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here