सावरवाडी (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने जानेवारी महिन्यांपासून लागू केलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिस बंदी विरोधात जिल्ह्यातील कुंभार समाज एकवटला आहे. पीओपी विरोधात ग्रामीण भागातील कुंभार बांधवांनी लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कुंभार समाजाचे नेते व माजी महापौर मारुतराव कातवरे यांनी केले. 

करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथे कुंभार समाज कृती समितीतर्फे आयोजित जनजागरण  मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कुंभार समाजावरील अन्याय रोखण्यासाठी व शासनाने पीओपी वरील बंदी उठवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर डिसेंबर महिन्यांत आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्धार सर्व कुंभार बांधवांनी यावेळी केला. यावेळी प्रा. प्रकाश कुंभार, शिवाजी कुंभार (कुडित्रे) पंढरीनाथ कुंभार (म्हालसवडे),  जिल्हा युवा अध्यक्ष उत्तम कुंभार, यांनी मनोगत व्यक्त केले.

या मेळाव्यास सतीश बाचणकर, संभाजी माजगावकर, शिवाजी वडणगेकर, बबन वडणगेकर, नामदेव कुंभार, कृष्णात कुंभार (खुपिरे), सदाशिव कुंभार (कुडित्रे), डॉ. रामचंद्र कुंभार आदीसह नंदगाव, बाचणी, हिरवडे, हसूर, शिरोली, कसबा बीड, खुपिरे, सांगवड़े, कांडगाव, वाशी, सडोली दु, कुडित्रे व इतर गावातील कुंभार बांधव उपस्थित होते.

मेळाव्याचे सडोली खालसा येथील कुंभार समाजाने संयोजन केले. नायकू कुंभार व धोंडीराम कुंभार यांनी स्वागत केले. प्रा. निवास कुंभार यांनी प्रास्ताविक तर राजाराम कुंभार (म्हारूळ) यांनी आभार मानले.