पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातल्या ४२ ग्रामपंचायतींपैकी ३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ३९ ग्रामपंचायतींचीच निवडणूक होत आहे. प्रशासन निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज झाल्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांनी सांगितले.    

तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींमध्ये एकूण ३८२ उमेदवार निवडले जातील. यात अनुसूचित जातींमधील ३४, मागास प्रवर्गातील ४७, मागास वर्ग स्त्री मधील ५४, अनुसूचित जाती स्त्रीमधील २०, सर्वसाधारणमधील १३८ व अनारक्षितमधील ८९ असतील. एकूण मतदार संख्या ९१३५७ इतकी असून यामध्ये ४७६५३ हे पुरुष मतदार  असून ४३९४४ या स्त्री मतदार आहेत. इतर मतदार २ आहेत. १५६ मतदार केंद्रे, १३० प्रभाग राहणार आहेत प्रत्येक मतदान केंद्रावर सहा कर्मचारी आहेत.

मतमोजणी १८ रोजी सकाळी ८ पासून नगरपरिषद सांस्कृतिक हॉल पन्हाळा येथे ९ फेऱ्यांमध्ये १८ टेबलवर पार पडेल.

पहिली फेरी – आपटी, नेबापूर, देवाळे, नावली, जेऊर, इंजोळे.

दुसरी – बुधवार पेठ, पैजारवाडी, आवळी, धबधबेवाडी, जाफळे, पोखले.

तिसरी – मोहरे, आरळे, सातवे, हारपवडे.

चौथी – तिरपण, कळे, पुनाळ, सातार्डे.

पाचवी – वाघवे, पोर्ले, उंड्री.

सहावी – सावर्डे, केखले, नणुंद्रे, निवडे, पुशिरे, निकमवाडी.

सातवी – तेलवे, म्हाळुंगे तर्फ बोरगांव, पोंबरे, पोहाळे तर्फ बोरगांव, वारनूळ, कणेरी.

आठवी – दिगवडे, पोहाळवाडी, माजनाळ, कोडोली.

नववी – कोडोली.

अशा पध्दतीने ३९ ग्रामपंचायतींची मतमोजणी होणार असल्याचेही तहसीलदार शेंडगे यांनी सांगितले.