कोल्हापूर (प्रतिनिधी) : पोलिसांनी गुन्ह्याची शहनिशा करून माझ्यावर गुन्हा दाखल करावा. तसेच माजी आणि दाभोळे यांची कुटुंबाची नार्को टेस्ट करावी. त्यातून सत्य निष्पन्न होईल असे अनिल म्हमाणे यांनी आपले म्हणणे प्रसिद्धी पत्रकाद्वारे मांडले आहे.

जगन्नाथ दाभोळे यांच्या पत्नीची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना एका  रुग्णालयांमध्ये दाखल केले होते. या दवाखान्याचे बिल दोन लाख  33 हजार रुपये झाले होते. हे बिल दाभोळे कुटुंबीय भागवण्यासाठी मी 2 लाख 33 हजार रुपये दिले. हे 2 लाख 33 हजार रुपये बुडवण्यासाठी दाभोळे यांनी माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला आहे. असे अनिल म्हमाणे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

दाभोळे यांची जून-जुलै दरम्यान 66 लाखांची रक्कम लंपास झाली होती. तर त्यावेळी त्यांनी या कालावधीमध्ये पोलीस ठाण्यात माझ्या विरोधात गुन्हा दाखल का केला नाही. तसेच  दाभोळे कुटुंबीयांना माझी बदनामी करायची होती. त्यामुळे त्यांनी माझ्याविरुद्ध खोटा गुन्हा शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.

पोलिसांनी या गुन्ह्याची सखोल माहिती घेऊन पोलिसांनी प्रथम माझी व नंतर दाभोळे कुटुंबाची नार्को टेस्ट करावी. म्हणजे सत्य काय ते समोर येईल, असे म्हणणे पत्रकाद्वारे मांडले आहे.