कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस  निरीक्षक तानाजी दिगंबर सावंत यांना यांना राष्ट्रपती पदक जाहीर जाहीर झाले आहे. त्यांनी पोलीस दलामध्ये सुरुवातीपासून आजपर्यंत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन त्यांना हे पदक जाहीर करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश केंद्र शासनाच्या वतीने जारी करण्यात आले आहेत.

देशातील संरक्षण आणि गृह खात्यामध्ये उत्कृष्ट सेवा बजावणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या वतीने स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती पदक जाहीर केले जाते. मंगळवारी होणार्‍या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने केंद्र शासनाच्यावतीने महाराष्ट्रातील सैन्यदल, पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील ५७  अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

पोलीस निरीक्षक तानाजी सावंत हे सन २०१६ साली नाशिकवरून कोल्हापूरला आले. सावंत यांनी आजवर अनेक न उघडकीला आलेले गुन्ह्यांना वाचा फोडली आहे. तसेच अनेक  गुन्हेगारांच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करुन त्यांना गजाआड केले आहे. तानाजी सावंत यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याचे समजताच पोलिस दलातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.