कचरा वर्गीकरण न केल्यास, उघड्यावर टाकल्यास कारवाई : पन्हाळा नगरपरिषदेचा इशारा

0
128

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा शहरातील नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी कचरा उघड्यावर न टाकता तो ओला, सुका आणि घरगुती घातक असे वर्गीकरण करून तो नगरपरिषदेच्या घंटागाडीमध्ये टाकावा.  कचरा वर्गीकरण करून न दिल्यास १०० तर कचरा उघड्यावर टाकल्यास १५० रुपये दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी स्वरूप खरगे यांनी दिली.

सार्वजनिक ठिकाणी लघुशंका केल्यास १००, शौच केल्यास ५०० तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. पन्हाळा नगरपरिषदेने सिंगल यूज प्लास्टिक वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. प्लास्टिक वापर करताना आढळून आल्यास पहिल्या वेळेस ५,०००, दुसऱ्या वेळेस १०,००० रुपये आणि तिसऱ्या वेळेस १५,००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

तरी नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२१’ व ‘माझी वसुंधरा’ अभियानात सहभाग घेऊन नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा सौ. रुपाली धडेल, उपनगराध्यक्ष चैतन्य भोसले यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here