कागल (प्रतिनिधी) :  शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांचा मंगळवार (दि.१९) जानेवारी रोजी ३८ वा वाढदिवस आहे. यानिमित्त  कागल येथे विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, राजे समरजितसिंह घाटगे हे वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते उपस्थित राहणार नसल्याचे वाढदिवस समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.

राजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि.१८) रोजी सकाळी दहा वाजता कागल तालुक्यातील करनूर येथे वृद्ध सेवाआश्रमामध्ये फळे वाटप आणि सायंकाळी साडे पाच वाजता अखिलेश पार्क येथे आदर्श निवृत्त अधिकाऱ्यांचा नागरी सत्कार होणार आहे. तसेच मंगळवार (दि.१९) रोजी काळम्मावाडी वसाहत येथे सकाळी नऊ वाजता रक्तदान शिबीर, अकरा वाजता ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच सायंकाळी सहा वाजता अनंत रोटोस्पिन येथील सरकार चौक येथे माजी सैनिक आणि जेष्ठ नागरीकांचा सत्कार कार्यक्रम आणि वड्डवाडी-गोसावीवाडी येथे मिठाई वाटप करण्यात येणार आहे. तर करनूर  येथील वृद्ध सेवा आश्रम येथे धान्य वाटपही होईल.

शुक्रवारी ( दि. २२) रोजी धनगर गल्ली येथे सकाळी नऊ वाजता मेंढी पळवणे स्पर्धा, तर सायंकाळी सहा वाजता लहान मुलांसाठी लिंबू चमचा आणि संगीत खुर्चीची स्पर्धा होणार आहे. शनिवारी (दि. २३) रोजी दुपारी दोन वाजता श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल येथे राजे समरजितसिंह घाटगे चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आणि बक्षीस वितरण होणार आहे. तर सायंकाळी सहा वाजता संभाजी चौक येथे होम मिनिस्टर स्पर्धा आणि रात्री नऊ वाजता धनगर गल्ली येथे धनगरी ओव्यांच्या स्पर्धा होणार आहेत. रविवारी (दि. २४) रोजी सकाळी सहा वाजता राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा होणार आहेत.

सोमवार (दि. २५) रोजी सकाळी दहा वाजता शाहूनगर बेघर वसाहत येथे भव्य रांगोळी स्पर्धा होईल. गुरुवारी (दि. २८) रोजी हणबर गल्ली येथे रात्री आठ वाजता होम मिनीस्टर स्पर्धा होईल. मंगळवारी दोन फेब्रुवारी रोजी गहिनीनाथ नगर येथे मालक चषक क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण होईल. तर सहा आणि सात फेब्रुवारी रोजी श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल येथे राज्यस्तरीय  हॉलीबॉल स्पर्धा होणार आहेत. या विविध स्पर्धांवेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजे समरजितसिंह घाटगे, राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ नवोदिता घाटगे, शाहू साखर कारखाना ,राजे बँक, दूधगंगा डेअरी, शाहू दूध संघ आणि शाहूग्रुप मधील विविध संस्थांचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.