जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन : डॉ. चंद्रशेखर साखरे

0
58

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे १५ ते ३५ या वयोगटातील युवक, युवतींसाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल पद्धतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी दिली.

या महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, एकांकिका, शास्त्रीय गायन (हिंदुस्थानी किंवा कर्नाटकी ), सितार वादन, बासरी वादन, तबला वादन, विणा वादन, मृदूंग, हार्मोनियम (लाईट), गिटार , मनिपुरी नृत्य, ऒडिसी नृत्य, भरतनाट्यम, कथ्थक, कुचिपुडी नृत्याच्या जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

विजयी स्पर्धक विभागस्तर युवा मोहत्सव स्पर्धेसाठी पात्र ठरतील. स्पर्धा जिल्हा, विभाग, राज्य-राष्ट्रीय या पद्धतीने आयोजित करण्यात येतील. ज्यांना स्पर्धेत सहभाग घ्यावयाचा आहे, त्यांनी २३ डिसेंबर पर्यंत आपल्या प्रवेशिका जिल्हा क्रीडा कार्यालयात सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमा कराव्यात. प्रवेशिकेचा नमुना व इतर माहिती जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या dsokop.blogspot.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here