कळे  (प्रतिनिधी) :  कोल्हापूरहून बेकायदेशीर देशी दारुची वाहतूक करणारी  ओमणी कार पकडून सुमारे ४८ हजार ४६४ रूपयांची देशी दारू आणि ओमणी कार जप्त करण्यात आली. ही कारवाई मरळी पैकी पोवारवाडी येथे बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास कळे पोलिसांनी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मरळी (ता.पन्हाळा)  येथील हॉटेल त्रिदेव बारचे मालक नंदकुमार पांडुरंग पाटील (वय ४३) कोल्हापूरहून बेकायदेशीर देशी दारूच्या  बाटल्या घेऊन ओमणी कारमधून गावी येत होते. त्यावेळी मरळी पैकी पोवारवाडी येथे बुधवारी रात्री १०:१५ वाजता कळे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकला. त्यानंतर ४८ हजार ४६४ रूपयांची देशी दारू आणि ओमणी (एमएच -०९ बीव्ही २३००)  कार  जप्त करण्यात आली.

पोलीस नाईक अरुण तुकाराम गुरव यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अंतर्गत नंदकुमार पाटील यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.  पुढील तपास पोलीस  हेडकॉन्स्टेबल सुशांत धनवडे करत आहेत.