पुणे (प्रतिनधी) : केंद्र व राज्य सरकारकडे अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याने कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटावर मात करता आलेली नाही. त्यामुळे कोरोनानंतर फार मोठा बदल होईल, असे मला वाटत नाही, अशी टीका बहुजन वंचित विकास आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी आज (गुरूवार) केली. विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

आंबेडकर म्हणाले, सरकारला ठोस भूमिका घेता आली नसल्याने पुणे, मुंबईतील लोकल अद्याप सुरु झालेली नाही. पण दुर्दैवाने सरकार याविषयी कोणताही निर्णय घेताना दिसत नाही. ते फक्त दुर्दैवाने आदेश काढत आहेत. यंदा कोरोनामुळे    अनुयायांनी घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. १ जानेवारी या देशातील सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस आहे, असे ते म्हणाले.