वृत्तपत्र विक्रेता ग्रा.पं.निवडणुकीच्या रिंगणात..!

0
185

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून अनेक मातब्बरांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तर दुसरीकडे एक सर्वसामान्य वृत्तपत्र विक्रेताही निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमाविण्यासाठी उतरला आहे.  

आज (बुधवार) निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाली आहे. गडहिंग्लज तालुक्यातील माद्याळ क || नूल येथून वृत्तपत्र विक्रेता आनंद गुरव यांनी श्री सोमलिंग ग्रामविकास आघाडीकडून अर्ज दाखल केला आहे. आण्णासाहेब देवगोंडा यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल गावातील सर्व जागा लढवत असून या पॅनलमध्ये एका वृत्तपत्र विक्रेत्याला संधी दिल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी पॅनलमधील शामराव घेज्जी, अशोक गवळी, भारत चौगले, राजू बोरगल्ली, प्रकाश कांबळे, प्रवीण कांबळे, बाबासाहेब पाटील, विद्या पाटील, सुमित्रा पाटील, सुवर्णा घेज्जी, विमल देवरमनी, शिवाजी गवळी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here