एमपीएसीकडून विविध पदांच्या पूर्व परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर

0
163

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. २०२० मध्ये मराठा आरक्षण आणि लॉकडाऊनमुळे ज्या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या त्या नवीन वर्षात घ्यायचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ठरवले आहे. एमपीएससीने याबाबत प्रसिद्धपत्रक जारी करुन नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२० मध्ये आयोजित परीक्षांचे सुधारित वेळापत्रक ७ सप्टेंबर २०२० च्या प्रसिद्धीपत्रकात जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार ११ ऑक्टोबर २०२० रोजी राज्य सेवा पूर्व परीक्षा प्रस्तावित होती. पण सरकारने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय ऐनवेळी घेतला. यासोबतच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा या दोन परीक्षाही पुढे ढकलल्याचं प्रसिद्धीपत्रक १३ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आले होते.

दरम्यान कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावाच्या परिस्थितीचा सरकारकडून वेळोवेळी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाचा अनुषंगाने आयोगाकडून आढावा घेण्यात येईल. तसंच याबाबतची माहिती आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे उमेदवारांनी नियमित वेबसाईटवर भेट देणे उचित ठरले, असं आयोगाने आपल्या प्रसिद्धपत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here