कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना अधिकाधिक सवलती देणार असल्याचा निर्णय बँकेचे अध्यक्ष आ. हसन मुश्रीफ यांनी घेतलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आ. मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयासह जिल्हाभरातील खेड्यापाड्यांमध्ये १९१ शाखा आहेत. ग्रामीण भागातील एवढ्या व्यापक शाखा विस्तारामुळेच लाभार्थ्यांना शाखा पातळीवर माहिती आणि मार्गदर्शन होण्यास मदत मिळते. त्यामुळेच बँकेने आज अखेर अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून हजारो लाभार्थ्यांना कोट्यावधींचा वित्तपुरवठा केला असल्याचे सांगितले.

यावेळी बँकेचे उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे, पी. एन. पाटील, खा. संजय मंडलिक, सतेज पाटील, डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, राजेश पाटील, माजी खा. निवेदिता माने, ए. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर आदी उपस्थित होते.