सांगली (प्रतिनिधी) : पाच-पन्नास हजाराचा नव्हे, तर चक्क दीड कोटीचा बोकड सांगलीच्या आटपाडीतील बाजारात विक्रीला आला होता. किंमती प्रमाणे त्याचे नावही आश्चर्च चकित करणारे आहे. त्याचे नाव मोदी असे आहे. या बोकडाला ७० लाखांना मागणी करण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या आटपाडीच्या बाजारात कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने बाजार भरला होता. या बाजारात सांगोला तालुक्यातील चांडोलवाडी येथील मेंढपाळ बाबुराव मेटकरी यांचा बोकड विक्रीला आला होता. मेटकरी यांनी बोकड्याला दीड कोटीची बोली लावली होती. मात्र, त्याला ७० लाखापर्यंत मागणी झाली. मात्र, मेटकरी यांनी दीड कोटीशिवाय बोकड विक्री करणार नसल्याचा निर्णय घेतल्याने त्याची विक्री होऊ शकली नाही.