कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यात महाविकास आघाडी सरकारने विकासकामे वेगाने सुरू केली, पण कोरोना आडवा आला. राज्याची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यामुळे प्राधान्यक्रम ठरवून, पुढील चार वर्षांत मतदारसंघातील सर्व विकासकामे पूर्ण करू आणि कोल्हापूर शहर राज्यात आदर्शवत करू अशी ग्वाही आ. चंद्रकांत जाधव यांनी दिली. ते सम्राटनगर प्रभागातील चाणक्य नगरमध्ये रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

आ. ऋतुराज पाटील म्हणाले की, पालकमंत्री सतेज पाटील, आ. चंद्रकांत जाधव यांच्या माध्यमातून सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी आणून, दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व विकासकामे मार्गी लावू.

यावेळी रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ विलासराव सपाटे, हणमंत पवार, चंद्रकांत जाधव, प्रमोद कुरणे, दुर्गेश वळवी, नितीन परुळेकर, शुभलक्ष्मी देशमुख, सरीता गवळी, तेजस्विनी मोहिते, श्रध्दा कोंडूसकर, श्रीमती सुनीला कदम, मीना पाटील, नंदिनी पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाला.

या वेळी आमदार जाधव, आमदार पाटील यांनी प्रभागातील नागरिकांशी संवाद साधून अपेक्षा जाणून घेतल्या. तसेच रस्त्याच्या कामाची पाहणी करून, कामाची गुणवत्ता व दर्जाबाबत सूचना दिल्या.

नगरसेविका जयश्री जाधव,  महिला शहराध्यक्ष संध्या घोटणे, प्रदीप जाधव, सर्जेराव साळोखे, रणधीर माने, अनिल पाटील, कपील मोहीते, अनिकेत सावंत, शांताराम पाटील, केदार पाटील, देवेंद्र रेडेकर, स्वप्निल रजपूत, चेतन भिसे आदी उपस्थित होते.