मुंबई (प्रतिनिधी) : मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना मोठा झटका बसला आहे. पासपोर्टमध्ये गुन्हे लपवल्याप्रकरणी त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. पासपोर्ट जप्तीची कारवाई झाल्यानतंर त्यांनी मंत्री वडेट्टीवार यांनी खुलासा केला आहे.

मंत्री वडेट्टीवार यांनी म्हटले की, माझ्यावर कोणत्याही प्रकारची केसची नोंद नाही. मी ओबीसींसाठी काम करीत आहे. माझ्याकडे पक्षाची जबाबदारी असल्याने मी पुढे जाऊ नये यासाठी विरोधक प्रयत्न करीत आहेत. मी स्वतः ईडी कार्यालयात जाऊन माझा पासपोर्ट देऊन आल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांना व्हेरिफिकेशन करून घेण्यास सांगितले असल्याचे म्हटले आहे.