टोप (प्रतिनिधी) : सभासद व ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या जळालेल्या ऊसाला तात्काळ उसतोड देऊन गाळपासाठी न्यावा, अशी सूचना माजी आमदार अमल महाडिक यांनी छत्रपती राजाराम कारखाना कृषी अधिकारी यांना दिल्या.

टोप आंब्याचा मळा येथील ११ एकर क्षेत्रातील काल (शनिवारी) जळालेल्या ऊस क्षेत्राला माजी आमदार अमल महाडिक यांनी भेट देऊन ऊसतोड करण्यास सांगितले. दरम्यान शॉर्टसर्किटने किंवा इतर काही कारणांनी ऊस जळतात, या अशा घटना घडू नयेत यासाठी महावितरणने योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमीच असल्याचेही महाडिक यांनी यावेळी सांगितले.

यावेळी छत्रपती राजाराम सह. साखर कारखान्याचे शेती अधिकारी बापुसो आवटे, सुगंध वाघ, मुकुंद पाटील, नागेश पाटील, संतोष पाटील, उपसरपंच विठ्ठल पाटील, आनंदराव पाटील, अरुण पाटील, अक्षय पाटील, निवास चौगले, शिवाजी चौगले, संभाजी चौगले, रोहित चौगले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.