आजरा (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत आज (बुधवार) तहसील कार्यालयात काढण्यात आली. १० ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तर, १० ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग, ४ ठिकाणी अनुसुचित जातीचे तर अन्य ४ ठिकाणी अनुसुचित महिला आरक्षण जाहीर झाले आहे.  ३७ ग्रामपंचायतीवर  महिलाराज येणार असून २२ ग्रामपंचायतींचे सरपंचपद खुले झाले आहे. परंतु अनेक गावात सत्ता एका पक्षाची तर सरपंच विरोधी पक्षाचा अशी परिस्थिती ओढवली आहे.

आजरा तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय सरपंचपदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे : –

अनुसुचित जाती : गजरगाव, सुळेरान, चिमणे, बेलेवाडी हु.

अनुसूचित जाती महिला : धामणे, सरबंळवाडी, इटे, वडकशिवाले.

नागरिकांचा मागास प्रवर्ग : चाफवडे, उत्तूर, शिरसंगी, शेळप, हालेवाडी, झुलपेवाडी, लाटगाव, मसोली, आवंडी, कोरीवडे.

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : सोहाळे, वझरे, कासार कांडगाव, चव्हाणवाडी, किणे, जाधेवाडी, मलिग्रे, पोळगाव, बुरुडे, हात्तिवडे.

सर्वसाधारण : मुरुडे, हाजगोळी खु, दाभिल, देवकांडगाव, देवर्डे, वेळवट्टी, साळगाव, हरपवडे, वाटंगी, शृंगारवाडी, सरोळी, कर्पेवाडी दु, मासेवाडी, कोवाडे, मेंढोली, सुलगाव, भादवणवाडी, खेडे, किटवडे, मडिलगे, निंगुडगे, पेद्रेवाडी.

सर्वसाधारण महिला : चांदेवाडी, यरंडोळ, गवसे, कानोली, लाकूडवाडी, सुळे, खोराटवाडी, होन्याळी, पारपोली, आरदाळ, हाजगोळी बु, भादवण, बहिरेवाडी, खानापूर, पेंढारवाडी, हाळोली, चितळे, महागोंड, कोळिंद्रे, देऊळवाडी, पेरणोली, होनेवाडी, मुमेवाडी.

या आरक्षणामुळे काही ठिकाणी खुशी तर काही ठिकाणी अनेकांच्या मनसुब्यावर पाणी फिरले आहे.