वेतवडेच्या उपसरपंचपदी माधुरी पाटील बिनविरोध  

0
371

कळे (प्रतिनिधी) :  पन्हाळा तालुक्यातील वेतवडे ग्रामपंचायतच्या उपसरपंच बेबीताई किरुळकर यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंचपदी ठरल्याप्रमाणे वेतवडे-गोगवे ग्रुप ग्रामपंचायत सदस्या माधुरी विनोद पाटील यांची बिनविरोध  निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक सागर निकम यांनी काम पाहिले.

निवडीनंतर सरपंच सुनिता दळवी यांच्या हस्ते उपसरपंच  माधुरी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जयसिंग पाटील, बाजीराव रामजी पाटील, राऊसो  पाटील,  पाडूरंग पाटील, हिंदूराव कांबळे, संभाजी पाटील,  अशोक दादू पाटील आदीसह  ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here