मामेभावाच्या खूनप्रकरणी आळते येथील तरुणास जन्मठेप

0
94

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मामेभावाचा खून केल्याबद्दल आळते येथील तरुणाला न्यायालयाने जन्मठेप तसेच पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. हरीश शरद दाभाडे (वय २९, रा. साठेनगर, आळते, ता. हातकणंगले)  असे त्याचे नाव आहे.

हरीश दाभाडे व सागर कांबळे हे एकमेकांचे आते-मामे भावंडे आहेत. आळते येथे ते एकमेकांच्या शेजारी ते राहात होते. सागरचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून हरीश दाभाडे व त्याच्यात नेहमी वाद होत असत. यातूनच ३१ मार्च २०१६ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास या दोघांत पुन्हा पूर्वीच्या कारणावरून आणि प्रॉपर्टीच्या कारणातून वाद झाला. रागाच्या भरात हरीशने चाकूने सागरच्या पोटावर व छातीवर वार केले. यात सागर गंभीर जखमी झाला. त्याचा सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

या प्रकरणी नेताजी बापू कांबळे यांच्या फिर्यादीनुसार हरीश दाभाडे याला हातकणंगले पोलिसांनी अटक केली होती. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रमोद नागलकर यांच्यासमोर झाली. न्यायालयाने हरीश दाभाडे याला जन्मठेप तसेच पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्याची सजा सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here