साळवण (प्रतिनिधी) :  गगनबावडा तालुक्यात वाहनांची संख्या वाढत चालली आहे. वाहन चालवण्याचा परवाना काढण्यासाठी तालुक्यातील लोकांना कोल्हापूरातील आरटीओ ऑफिसला जाणे शक्य होत नाही. म्हणून गगनबावडा तालुक्यात प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या मंगळवारी लायसन्स कँम्प घेतला जातो. यावेळी कॅम्पसाठी मोटार वाहन निरिक्षक प्रदिप शिंगारे हे होते. तर सहाय्यक मो.वा. निरक्षक मिलिंद नंदुसिंग रजपुत हे होते.

यावेळी लर्निंग लायसन्स काढण्यासाठी १०२ उमेदवार तर पक्के लायसन्ससाठी १०१ उमेदवार उपस्थित होते. या सर्वांना प्रदिप शिंगारे यांनी वाहतुकीचे नियम आणि हेल्मेट वापरण्यासाठीचे माहिती दिली. यावेळी प्रदिप शिंगारे यांनी हेल्मेट टु व्हिलर वरती किती गरजेचे आहे, हेल्मेट असेल तर अपघात झाल्यावर चालकाला कमी प्रमाणात कशी इजा होते याची माहीती दिली. तसेच गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे टाळा, असे आवाहनही केले.