‘त्या’ ट्विटची शहानिशा केल्यानंतर बोलू : अजित पवार

0
70

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले की, ‘त्या’ ट्विटची आम्ही शहानिशा करून त्यामागचे कारण शोधून काढले जाईल. जाणीवपूर्वक गडबड झाली की अनावधानाने गडबड झाली? ही बाब तपासून बघितली जाईल. घाईत कधी कधी अशा गोष्टी घडत असतात.  राज्यात तीन पक्षाचे आघाडीचे सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रम निश्चित केला आहे. आघाडी सरकार चालवताना एखाद्या विषयावरून पेच निर्माण होत असतो. पण त्यावर चर्चा करून योग्य मार्ग काढला जातो. त्याचप्रमाणे औरंगाबादच्या नामांतराबाबत तिन्ही पक्ष एकत्र बसून मार्ग काढतील.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here