विधान परिषदेच्या उपसभापतींची रेल्वे रूळावर आत्महत्या

0
234

बेंगळुरू (वृत्तसंस्था) : कर्नाटक विधान परिषदेचे उपसभापती एसएल धर्मगौडा यांनी आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री घडली. चिक्कामागलुरू जिल्ह्यातील कादूरजवळील एका रेल्वे रुळावर रात्री दोन वाजता त्यांचा मृतदेह आढळून आला.  या घटनेमुळे  राजकीय वर्तुळाला धक्का बसला आहे.  

पोलिसांना मृतदेहाजवळ धर्मगौडा यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली सुसाईड नोटही सापडली आहे. ६४ वर्षीय धर्मगौडा जेडीएसचे नेते आणि विधान परिषदेचे उपसभापती होते. विरोधी पक्ष काँग्रेसच्या आमदारांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले होते. बेकायदेशीरपणे सभागृहाचे कामकाज चालवत असल्याचा आरोप काँग्रेसच्या आमदारांनी त्यांच्यावर केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here