नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक अरिष्ट्यात अडकलेल्या लक्ष्मी विलास बँकेच्या विलीन करण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यानंतर आरबीआयने लक्ष्मी विलास बँकेची डीबीएस इंडियामध्ये विलीन करण्याची घोषणा केली. आता शुक्रवारी (दि.२७) बँकेचे विलीनीकरण होणार असून लक्ष्मी विलास बँकेचे नाव बदलून डीबीएस बँक होणार आहे.   

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लक्ष्मी विलास बँकेवर निर्बंध आणले होते. त्यानंतर कॅबिनेटने देखील आरबीआयच्या या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. त्यानंतर  आरबीआयकडून बँकेवर लागू केलेला मोरेटोरियम हटविण्यात आला आहे. दरम्यान, याआधी रिझर्व्ह बँकेने येस बँक आणि पीएमसी बँकेवर निर्बंध आणले होते. लक्ष्मी विलास बँक सिंगापूरच्या सर्वात मोठ्या डीबीएस बँकेच्या भारतीय शाखेत विलीन होईल. बँक वाचविण्यासाठी आरबीआयने डीबीएस इंडियाबरोबर विलीनीकरणाचा निर्णय घेतला. भारतीय बँकचे एखाद्या विदेशी बँकेत विलीनीकरण होण्याची ही पहिलीच वेळ आहे.