इचलकरंजी (प्रतिनिधी) : डिकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील माजी विद्यार्थीनीची पीएचडीसाठी ‘द युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टर, इंग्लंड’ या नामांकित विद्यापीठामध्ये निवड झालेली आहे. हे विद्यापीठ इंग्लंडमधील व्द्तिीय क्रमांकाचे मोठे विद्यापीठ आहे.

क्षितीजा जाधव या विद्यार्थीनीची पीएचडी इन मटेरियल्स या ४ वर्षाच्या कोर्ससाठी इंग्लंड येथे निवड झालेली आहे. सन २०१५-१६ साली मेकॅनिकल इंजिनिअरींगमधून तिने पदवी प्राप्त केली होती. तसेच क्षितीजाने आपले उच्चशिक्षण ‘एमएसइन अ‍ॅडव्हान्स मेकॅनिकल इंजिनिअरींग’ न्यु कॅसल युनिव्हर्सिटी, इंग्लंडमधून पूर्ण केलेले आहे. या अभ्यासक्रमादरम्यान क्षितीजाला अ‍ॅडीटीव्ह मॅन्युफॅक्चरींग, साधने व मटेरियल, पॉलीमर्स, मेटल्स, कम्पोजिटस, कम्प्युटेशनल डिझाईन टूल्स, मॅन्युफॅक्चरींग प्रोसेस आणि मटेरियल निवड, बायोमटेरियल अशा विविध अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे.

मेकॅनिकल इंजिनिअरींग अभ्यासक्रमातील मेटॅलर्जी, मशिन टूल्स अँन्ड प्रोसेसिंग, वर्कशॉप प्रॅक्टीस, मॅन्युफॅक्चरींग इंजिनिअरींग, स्ट्रेंग्ध ऑफ मटेरियल्स, मशिन डिझाईन या विषयांचा विद्यार्थीनीच्या निवडीसाठी फायदा झालेला आहे.  तसेच मेकॅनिकल विभागामध्ये असलेल्या इ-फौंड्री, मेटॅलर्जी, मॅन्युफॅक्चरींग प्रोसेस या लॅबमध्ये घेतलेल्या ट्रेनिंगचा आणि केलेल्या प्रकल्पाचा देखील तीला निवडीसाठी फायदा झाला.

क्षितीजा जाधव हिला संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष आणि आमदार प्रकाश आवाडे,  ट्रेझरर आर.व्ही. केतकर, सचिव डॉ. सपना आवाडे आणि सर्व विश्‍वस्तांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे संचालक प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले, उपसंचालक प्रा.डॉ. यु.जे. पाटील, उपसंचालिका प्रा.डॉ.सौ. एल.एस. आडमुठे, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागप्रमुख प्रा.डॉ.व्ही.आर. नाईक, प्रा.डॉ.व्ही.डी. शिंदे, शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.