परभणी (प्रतिनिधी) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय सेलूचे विद्यार्थिनी शितल तवलेंनी चकलंबा गावातील शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केले.

शितल यांनी कृषि कार्यानुभव RAWE 2020-21 प्रकल्पांतर्गत  पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया कशी करावी ? त्याचे फायदे, तोटे आणि अनेक जीवामृत प्रक्रिया, चारा प्रक्रिया, शेतकऱ्यांना पीक कर्जाबद्दल माहिती, बँक पीक कर्ज विषयी माहिती, जनावरांना लसीकरण, ठिबक सिंचनाचा वापर, बोंड आळी मार्गदर्शनासाठी वेगळ्या विषयावर प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना ZERO ENARGY CHAMBERS, ENAM APP, VNMKV APP. यांची माहिती करुन दिली.

या वेळी बाबासाहेब गाढे, भागवत फाटक, किसन गाढे, योगेश फाटक, रावसाहेब नागरे, गोविंद फाटक, गणेश गाढे, नितीन गाढे, रामा केकान, बाबासाहेब फाटक आदी उपस्थित होते. तर विद्यालयाचे प्राचार्य एस. एस. राऊत, कार्यक्रम अधिकारी लिपने, लंगुटे, डॉ. काझी, डॉ. पुराणिक, घालगिर, चव्हाण, ढोकार, करंजे, वाहेकर, डॉ. श्रीमती  देशविना, डॉ. सुरवसे यांचे मोलाचे मार्गदर्शन ठरले.