कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचा असाधारण, असूचना कुशलता पदकाने सन्मान

0
71

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गडचिरोली येथे नक्षलवाद्यांच्या विरोधात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल केंद्रीय गृह खात्याच्या वतीने कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना असाधारण असूचना पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

शैलेश बलकवडे हे कोल्हापुरात येण्यापूर्वी गडचिरोली विभागात कार्यरत होते. त्या वेळी त्यांनी गडचिरोली परिसरातील नक्षलवाद्यांचे पुनर्वसन केले होते. तसेच कट्टर नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल केंद्रीय गृह विभागाने घेतली होती. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा ‘असाधारण असूचना कुशलता पदक 2020 (INTELLIGENCE AWARD)’ या पदकाने सन्मान केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here