कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात १३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात ४१ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १,२८९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ४ , गडहिंग्लज तालुक्यातील १,  करवीर तालुक्यातील २,  इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील २ आणि इतर जिल्ह्यातील ४ अशा एकूण १३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर कागल तालुक्यातील निढोरी येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ४१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या : ४९,२५६.

एकूण डिस्चार्ज : ४७,३७२.

उपचारासाठी दाखल रुग्ण : १९३.

एकूण मृत्यू : १६९१.