कोल्हापूर कोरोना अपडेट  : दिवसभरात ३८ जणांना डिस्चार्ज

0
149

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (सोमवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात १२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात ३८ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच २२२५ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार मागील चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ६, हातकणंगले तालुक्यातील १, पन्हाळा तालुक्यातील १, राधानगरी तालुक्यातील २, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील २ अशा एकूण १२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ३८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४९,२९८ झाली असून ४७, ४७७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर १६९२ जणांचा मृत्यू झाला असून १२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here